मुंबई

सकारात्मक दृष्टिकोन, आत्मपरीक्षण आवश्यक

CD
सकारात्मक दृष्टिकोन, आत्मपरीक्षण आवश्यक पालघर, ता. १० (बातमीदार) : निरामय जीवनासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मपरीक्षण या दोन गोष्टींची गरज आहे. जीवनामध्ये आपण कुणाला मदत केली आणि आपल्याला कोणी मदत केली यांची यादी बनवा, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण कुठे आहोत, याची कल्पना येईल, असे प्रतिपादन उद्योजक अनंत वर्तक यांनी केले. विराथन येथील अभिनव विद्यालयामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नम्रता दळवी आणि सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर प्रभाकर किणी यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वर्तक यांनी मार्गदर्शन केले. शाळा हे मुलांचे आनंदस्थळ असून शिक्षक हा समाज परिवर्तनाचा एक प्रमुख घटक आहे. म्हणूनच शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा विविध सामाजिक अथवा राजकीय उपक्रमांमध्ये कार्यरत राहून समाजाची सेवा करणे आवश्यक आहे, असे सांगितले. या वेळी मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दामोदर पाटील, चंदुलाल घरत, विनोद मोरे, विराथन सरपंच शरद घरत, मुख्याध्यापक नरेश किणी, प्रमोद पाटील, मनोहर पाटील, हिना पाटील, मनीष जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : खरात प्रकरणी सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

SCROLL FOR NEXT