मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

CD

पुणे, ता. १२ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १४) शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये पुणे स्टेशन, लष्कर परिसर, विश्रांतवाडी, सावरकर चौक, दांडेकर पूल, दत्तवाडी परिसरात वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लष्कर परिसरातील हॉटेल अरोरा टॉवर्स येथील डॉ. आंबेडकर पुतळा व विश्रांतवाडी येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे या परिसरात गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

असा आहे बदल...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ः
- शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद, वाहनचालकांनी शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक मार्गे, आरटीओ चौक, जहाँगीर चौकातून पुढे जावे.
- जीपीओ चौकाकडून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक बंद, जीपीओ चौकातून बोल्हाई/मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छित स्थळी जावे
- पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद,
- नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद, वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभार वेसमार्गे पुढे जावे
- बॅनर्जी चौकातून अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बंद, बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभार वेसमार्गे पुढे जावे

लष्कर परिसर, हॉटेल अरोरा टॉवर्स
- कोयाजी रोडवरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे बंद करून ती एसबीआय हाऊस मार्गे वळविली आहे
- इस्कॉन मंदिर चौकाकडून अरोरा टॉवर्स येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे
- नेहरू चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, ही वाहतूक नेहरू चौकातून डावीकडे किराड चौकाकडे वळविली आहे

विश्रांतवाडी परिसर
- पुणे विमानतळाकडून टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेंटल कॉर्नर चौकातून वळून कॉमर्स झोन चौकाकडून डावीकडे वळून विमानतळाकडे पुढे जातील
- पुण्याकडून बोपखेल, दिघी, आळंदी, भोसरीकडे जाणारी वाहने शांतिनगर चौकातून वळून चव्हाण मासे मार्केट परिसरातून पुढे जावे
- कळस, म्हस्केवस्ती, बोपखेल, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कच्च्या मार्गाने शांतिनगर परिसरातून पुढे जावे

सावरकर चौक ते सिंहगड रस्ता बंद...
दांडेकरपुल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्य प्रदेशातील महू येथील जन्मठिकाणाचा देखावा तयार केला आहे. त्यामुळे दत्तवाडी वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल केला आहे. त्यानुसार, सावरकर चौक येथून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याकडे (सिंहगड रस्ता) जाणारी वाहतूक बंद केली आहे. तसेच, याच रस्त्यावरील आशा चौक येथून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - स्वारगेटहून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सावरकर चौक, सारसबाग चौक, सणस पुतळा, कल्पना हॉटेल चौक, ना. सी. फडके चौक, सेनादत्त पोलिस चौकी, बालशिवाजी चौक येथून पुढे जावे, तर सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी आशा हॉटेल चौकातून डावीकडे वळून बाल शिवाजी चौक, सेनादत्त पोलिस चौकी, ना. सी. फडके चौक, कल्पना चौक येथून पुढे जावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT