मुंबई

राज्य सरकार आणि महापौरांना नोटीस

CD
राज्य सरकार आणि महापौरांना नोटीस शेलार यांच्या याचिकेवर न्यायालयाची कारवाई सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : वरळी येथे झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणानंतर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. शेलार यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावली आहे. शेलार आणि महापौर पेडणेकर जबाबदार नागरिक आणि नेते आहेत. त्यांनी आपापसातील वाद सामंजस्याने मिटवायला हवेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. सिलिंडर स्फोटानंतर शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती. यामध्ये त्यांनी काही आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख केला होता. याबाबत पेडणेकर यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. अनिल किल्लोर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि पेडणेकर यांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT