sms
sms sakal media
मुंबई

मुंबई : हवाई सुंदरी पत्नीला SMS द्वारे तलाक, पतीला HC कडून जामीन

CD

‘एसएमएस’द्वारे तलाक देणाऱ्या पतीला न्यायालयाकडून जामीन

मुंबई : पत्नीला मोबाईलवर एसएमएसद्वारे तोंडी तलाक (Triple Talaq) देणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) जामीन मंजूर केला आहे. पत्नीने पतीविरोधात गतवर्षी जून महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली होती, तर पतीने घटस्फोट मिळण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. याबाबत कनिष्ठ न्यायालयाने पत्नीला नोटीस बजावली असून तिने दंडाधिकारी न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्जदेखील केला आहे. (Mumbai high court granted bail to a person who had given divorce to his wife through sms)

या पार्श्वभूमीवर पतीने आपल्याला ‘एसएमएस’द्वारे मेसेज करून तलाक दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी पत्नीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यामुळे अटकेच्या शक्यतेमुळे पतीने जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी पतीचा कोठडीसाठी ताबा मिळवण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करून न्यायालयाने पतीला जामीन मंजूर केला.

हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या पत्नीने निकाहानंतर सासू सासऱ्यांसाठी नोकरी सोडली; मात्र माहेराहून पैसे आणण्यासाठी सासू-सासरे दबाव आणतात, असा दावा तिने केला. मे २०२१ मध्ये पेस्ट कंट्रोल करण्याच्या कारणावरून तिला आणि तिच्या मुलाला माहेरी पाठविण्यात आले. त्यानंतर तिला पुन्हा सासरी येण्यास नकार दिला, असे तिच्यावतीने सांगण्यात आले; मात्र पतीकडून त्याचे खंडन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT