vikramgad nagarpanchayat election
vikramgad nagarpanchayat election sakal media
मुंबई

नगरपंचायत निवडणूक : विक्रमगड विकास आघाडीकडून राष्ट्रवादी, भाजपचा सुपडा साफ

CD

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीच्या (vikramgad nagarpanchayat election) १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ‘विक्रमगड विकास आघाडी’ने १३ जागांवर विजय मिळवत आपली एकहाती सत्ता राखली आहे; तर एका जागेवर शिवसेनेचा (shivsena) उमेदवार विजयी झाला आहे. विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडी १४, भाजप ११ उमेदवार, राष्ट्रवादी ७, शिवसेना ९, काँग्रेस ३, मनसे २, अपक्ष २ असे एकूण ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु या नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजपला (BJP) तर भोपळाही फोडता आला नाही. निवडणुकीआधीच विक्रमगड विकास आघाडीचे ३ उमेदवार बिनविरोध झाल्याने १७ पैकी १६ जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. (Vikramgad vikas aghadi won thirteen seats in nagarpanchayat elction)

नगरपंचायत निवडणुकीसाठी विक्रमगड विकास आघाडीने ३ उमेदवार बिनविरोध करून सर्वच पक्षांना धक्का दिला होता. विक्रमगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी निलेश सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडीला शह देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. राष्ट्रवादीचा मागील निवडणुकीत एक उमेदवार विजयी झाला होता. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा पराभव आमदार भुसारा यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विक्रमगड विकास आघाडीच्या माजी नगरध्यक्षा प्रतिभा पडवळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत प्रभाग ८ मधून निवडणूक लढवली.

मात्र त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग १ मधून शिवसेनेकडून सोनल गवते यांनी विजय मिळवला. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला विक्रमगडमध्ये भाजप पूर्णतः भुईसपाट झाली आहे. मनसे, काँग्रेसची पाटीही कोरीच राहिल्याने त्यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप व राष्ट्रवादीच्या दृष्टीने धक्कादायक लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत ७९.३४ टक्के मतदान झाले होते. याचा परिणाम स्पष्ट जाणवला आहे. आता विक्रमगड विकास आघाडीने १६ जागा जिंकल्याने नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विक्रमगड नगरपंचायतीमध्ये विक्रमगड विकास आघाडीने केलेल्या विकासकामांमुळे विक्रमगडच्या जनतेने आम्हाला कौल दिला आहे. जनतेने भाजपच्या स्थानिक नेत्यांना व राष्ट्रवादीच्या आमदारांना सपशेल नाकारले आहे. सामाजिक काम व जनतेचा विकास हेच आमचे ब्रीद वाक्य आहे. - नीलेश सांबरे, विक्रमगड विकास आघाडी. यापूर्वीचा निकाल... २०११ च्या विक्रमगड ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-सेना युतीच्या १५ चे १५ सदस्य निवडून आले होते. २०१६ च्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. १७ प्रभागातून भाजप २, शिवसेना १, राष्ट्रवादी १, जागृत पॅनेल ६, विक्रमगड विकास आघाडी-काँग्रेस युती -७ असे उमेदवार निवडून आले होते.

विजयी उमेदवार प्रभाग उमेदवार मिळालेली मते पक्ष १ गवते सोनल सुरेश २०६ शिवसेना २ वाघ मनोज विलास १४४ विक्रमगड विकास आघाडी ३ भडांगे चंद्रशील अमोल ११७ विक्रमगड विकास आघाडी ४ पडवळे निलेश रमेश २३७ विक्रमगड विकास आघाडी ५ माडी ज्योत्स्ना योगेश १०५ विक्रमगड विकास आघाडी ६ महाला जयश्री पांडुरंग १५७ विक्रमगड विकास आघाडी ७ डंबाळी पुष्पा मोहन बिनविरोध विक्रमगड विकास आघाडी ८ बांडे भारती रमेश १४४ विक्रमगड विकास आघाडी ९ सांबरे माधुरी विष्णू ११४ विक्रमगड विकास आघाडी १० तामोरे वैशाली गणेश १५५ विक्रमगड विकास आघाडी ११ भडांगे अमोल दिलीप बिनविरोध विक्रमगड विकास आघाडी १२ मेघवाली विजय विठ्ठल १५२ विक्रमगड विकास आघाडी १३ लोहार अर्चना श्याम १७५ विक्रमगड विकास आघाडी १४ कनोजा किर्ती सुरेश बिनविरोध विक्रमगड विकास आघाडी १५ भावर अमित जान्या १४० विक्रमगड विकास आघाडी १६ पाटील महेंद्र तुकाराम २१७ विक्रमगड विकास आघाडी १७ महाला निमा अंकुश १५४ विक्रमगड विकास आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT