NCP
NCPSakal

तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी सरस; भाजपचा तीन ठिकाणी विजय

तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, शिवसेनेला चार जागा

तळा : तळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Tala nagar panchayat election) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP wins) बाजी मारली आहे. या ठिकाणी १० जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याने पक्षाकडे एकहाती सत्ता आली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना (shivsena) सत्तेत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (sunil tatkare), पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी लक्ष घालून तळा नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेचा चंग बांधला. येथील मतदारांनीही त्यांच्या बाजूने कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्याने विकासाची घोडदौड सुरू होईल, अशी आशा नागरिकांना आहे. (Nationalist congress party wins in tala nagarpanchayat election)

NCP
पोलादपूरमध्ये वाघाची डरकाळी कायम; पुन्हा भगवा फडकला

तळा नगरपंचायतीच्या गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेना नेते दिवंगत बाळशेठ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी अथक प्रयत्नांने ही निवडणूक जिंकली. राकेश वडके, लीलाधर खातू, नमिता पांढरकामे अशा खिलाडू वृत्तीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जोमाने जिंकली; परंतु पाहिजे तसा विकास करण्यात शिवसेना कुठेतरी कमी पडली असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला दिसत आहे.

यावेळी प्रचारासाठी शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी सभा घेऊन सुद्धा फारसा काही फरक मतदारांवर पडलेला दिसत नाही. त्यातच भाजपच्यावतीने विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनीही प्रचार केला. यांच्या प्रयत्नातून भाजपने तीन जागा जिंकून आपले खाते तळा नगरपंचायतीमध्ये उघडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com