Electric Bus sakal media
मुंबई

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ताफ्यात येणार ४० इलेक्ट्रीक बस

पालिकेच्या ताफ्यात येणार ४० इलेक्ट्रीक बस, १२४.३३ कोटींचे अनुदान मंजूर

CD

कल्याण : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाकरिता पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत महापालिकेस (KDMC) १२४.३३ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून लवकरच ४० इलेक्ट्रिक बस (Forty electric bus) खरेदी करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाकरिता पालिकेने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (dr vijay suryavanshi) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कृती आराखडा तयार करून महाराष्ट्र सरकारकडे पाठविला होता. या संदर्भात शहर अभियंता सपना कोळी -देवनपल्ली, पर्यावरण व प्रदूषण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड यांनी राज्याचे पर्यावरण व वातावरण बदल विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली.

बैठकीत शहर कृती आराखड्याच्या अनुषंगाने केलेल्या सादरीकरणास मंजुरी मिळाली असून महापालिका क्षेत्रासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छ कार्यक्रम’ पाच वर्ष राबविण्याकरिता महाराष्ट्र सरकारने १२४.३३ कोटी अनुदान मंजूर केले आहे. ३३.११ कोटी वितरित अनुदानापैकी ३३.११ कोटी पहिल्या टप्प्यात महापालिकेस वितरित करण्यात आले आहेत. यात बारा मीटरच्या १५ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस व नऊ मीटरच्या साध्या ४० बस खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बससाठी पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात सहा चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यात येणार असून एकूण ६२ चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे शहारातील प्रदूषणात घट होण्यास मदत होईल.

राडारोडा प्रक्रिया प्रकल्प राबवणार महापालिका क्षेत्रात बांधकाम राडारोडा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये अनधिकृत डम्पिंग, बर्निंग करणाऱ्यांविरोधात पाहणी करण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची तजवीज केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बारावी स्मशानभूमीसमोरील जागेत बांधकाम राडारोडा साहित्य प्रक्रिया प्रकल्प तयार केला जाणार असून त्यामध्ये उरलेले बांधकाम साहित्य खडी, रेती यावर प्रक्रिया केली जाणार आहे. याच कार्यक्रमांतर्गत शास्त्रीनगर, तिसगाव येथील दोन एकर आरक्षित जागेवर गॅस शवदाहिनी उभारली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर प्युरिफायर खरेदी करून ते शहरातील मुख्य ठिकाणी बसवले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT