मुंबई

सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक

CD
सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ३० हजार घेताना सिडकोचा कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे पाटील याने यापूर्वी तीन बिले मंजूर करण्यासाठी एक लाख २० हजार रुपये स्वीकारले होते. तक्रारदार ठेकेदाराने कळंबोली ब्रिज व खारघर रेल्वेस्थानक येथील ब्रिजची कामे पूर्ण करून बिल सादर केले होते. यावेळी पाटील याने मागील तीन बिलांचे बाकी राहिलेले ३० हजार रुपये व चालू नवीन तीन बिलांचे दीड लाख रुपये दिल्यानंतरच त्याच्या बिलावर सही करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ठेकेदाराने १८ जानेवारीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर पाटील याने मागील बिलातील राहिलेली ३० हजारांची रक्कम घेऊन सीबीडीतील एमजीएम हॉस्पिटलजवळ बोलावले होते. त्याठिकाणी कारमधून आलेल्या पाटील याने ठेकेदाराकडून ३० हजारांची रोख रक्कम घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले. त्यानंतर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. चौकट यापूर्वीही घेतली होती लाच तक्रारदार ठेकेदाराने कळंबोळी ब्रिज, खांदा कॉलनी व खारघर रेल्वेस्थानकाची कामे पूर्ण केली होती. या तीन बिलांचे सात लाख ५६ हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड झाल्याने पाटील याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी ठेकेदाराने पाटील यांना एक लाख २० हजार रुपये दिल्यानंतर बिल मंजूर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT