मुंबई

धर्मवीर" चित्रपटातून उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

CD
‘धर्मवीर’मधून उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट ठाणे, ता. २८ (बातमीदार) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचे स्थान बळकट करणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणार असून याचे पोस्टर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर गुरुवारी रिलीज करण्यात आले. साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे मंगेश देसाई हे ‘धर्मवीर'' या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत; तर प्रवीण विठ्ठल तरडे हे चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत. केदार गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत; तर चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकवर्गात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या ‘धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे शहरातील विविध भागांत सुरू आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘धर्मवीर'' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT