मुंबई

स्वातंत्र्यसैनिक ऑगस्टीन मनवेल बांड्या कोळी यांचे निधन

CD
उत्तनमधील स्वातंत्र्यसैनिक ऑगस्टिन मनवेल बांड्या कोळी यांचे निधन भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) ः उत्तनमधील स्वातंत्र्यसैनिक ऑगस्टिन मनवेल बांड्या कोळी यांचे रविवारी (ता. ३०) सकाळी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. कोळी यांच्या निधनाने मिरा भाईंदरमधील स्वतंत्र्यसैनिकांच्या पिढीतील अखेरचा तारा निखळला आहे. उत्तनमधील दर्या माता चर्च येथे त्यांच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑगस्टिन कोळी यांनी ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून देत १९४० मध्ये रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. कोळी यांनी काही काळ मुंबईत राहून दहिसर, बोरिवली तसेच पाणजू बेटावर भूमिगत कारवायांमध्ये सहभाग घेतला. १५ जानेवारी १९४१ मध्ये उत्तन तलाठी कार्यालयासमोर झालेली स्वातंत्र्य चळवळीची सभा ऐतिहासिक ठरली होती. या सभेला ३०० जण उपस्थित होते. त्यानंतरही ऑगस्टिन कोळी यांच्या प्रभात फेऱ्या, समूह बैठका, पत्रके वाटणे, मिठाचा सत्याग्रह आदी सुरूच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT