BJP and PWP party workers with Flag Sakal Digital
मुंबई

नवी मुंबई : भाजपाला रोखण्यासाठी शेकापची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा

कामोठे : पनवेल महापालिका (Panvel Municipal corporation) क्षेत्रात भाजपचे (bjp) वर्चस्व वाढत आहे. एकेकाळी कामोठे नोड शेकापचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्यात भाजपने शेकापला विधानसभा व महापालिका निवडणुकीत (election) पिछाडीवर टाकले आहे. आगामी निवडणुकीत यशाला गवसणी घालण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सज्‍ज झाला असून नवीन पदाधिकारी नियुक्तीवर भर दिला आहे. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आ. बाळाराम पाटील (Balaram patil) यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

पनवेल महापालिका स्थापनेपूर्वी कामोठे नोडमध्ये शेकापचे निर्विवाद वर्चस्व होते. राज्यातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये कामोठेचा उल्लेख होता. ग्रामपंचायतीवर शेकापची एकहाती सत्ता होती. मात्र भाजपने ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभार उघड केल्‍यामुळे शेकापच्या अस्तित्वाला हादरा बसला. २०१७ मध्ये पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शेकापला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली आणि कामोठेतही कमळ फुलले.

त्‍यानंतर बदलत्या राजकीय प्रवाहात शेकापची तथाकथित नेतेमंडळी भाजपच्या गोटात सामील झाली.
आता सर्वच राजकीय पक्षांना महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानिमित्ताने पाटील यांनी शेकापक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्‍या आहेत. बाळाराम पाटील यांनी ३५ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली. शेकाप कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास नगरसेवक सखाराम पाटील, माजी नगरसेवक प्रमोद भगत, नाना भगत, अल्पेश माने, कुणाल भेंडे आदी उपस्थित होते

पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती

अमोल शितोळे या तरुण कार्यकर्त्यांकडे कामोठे शहर अध्यक्षपदाची धुरा सुपूर्द केल्यानंतर कामोठे महिला अध्यक्षपदी उषा झनझने यांची नियुक्ती केली आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर रमेश गोरे यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Sugar Season : महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू...

IND vs AUS 1st ODI Live: २५ धावांत ३ विकेट्स! विराट कोहलीला 'गंडवलं', भोपळ्यावर माघारी पाठवलं; शुभमन गिलही परतला Video

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

Kolhapur Sex Worker : कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली, प्रकरणातील नवी अपडेट समोर

Diwali 2025: दिवाळीत पाण्यावरचे दिवे मुलांसाठी धोकादायक, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?

SCROLL FOR NEXT