Corona sakal
मुंबई

मुंबईकर आठवड्याभरात निर्बंधमुक्त? पॉझिटिव्हीटी रेट १ टक्क्यापेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा

कोविड निर्बंधात शिथिलता येऊन पंधरवडा झाल्यानंतर मुंबईत रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या ‍खाली आला आहे.

मुंबई - कोविड निर्बंधात शिथिलता येऊन पंधरवडा झाल्यानंतर मुंबईत रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या ‍खाली आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातील कोविड परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्बंध अधिक शिथिल होण्याची शक्‍यता आहे. परिस्थिती सुधारल्यास सर्वच निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याबरोबर कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

मुंबईत आज ३९ हजार ५९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३४९ कोरोनाबाधित आढळले. कोविड पॉझिटिव्हिटीचा दर ०.८८ टक्‍क्‍यांवर आहे. त्याचबरोबर यापूर्वीचे कोविड निर्बंध हटवून १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्याच्या ‍खाली आहे.
१४ दिवसांत कोविड पॉझिटिव्हिटी दर वाढला असता तर संसर्ग वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र, आता तशी परिस्थिती नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. कोविड नियंत्रणात असल्याने येत्या आठवड्याचा आढावा घेऊन निर्बंधांत अधिक शिथिलता आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्याने सांगितले. ‘पुढील आठवड्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत राज्याच्या टास्क फोर्सला माहिती सादर केली जाईल,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकल प्रवासासाठी आजही लशीचे दोन डोस आवश्‍यक आहेत. मॉलमध्ये जाण्यासाठी दोन डोसची अट आहे. त्याचबरोबर नाट्यगृह, सिनेमागृह आणि उपाहारगृहांमधील उपस्थितीला ५० टक्‍क्‍यांची मर्यादा आहे. लग्नासह इतर समारंभही मर्यादित उपस्थितीत साजरे करायचे आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्यास सर्वच निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात. निर्बंध हटले तरी मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि गर्दी टाळण्यासारखे नियम कायम राहणार आहेत. मुंबईतील १०० टक्के प्रौढांनी कोविड प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. ९५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

वाढीचा दर ०.०६ टक्के
कोविड वाढीचा दर ०.०६ टक्‍क्‍यांवर आला आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार जागतिक साथीच्या आजाराच्या रुग्णवाढीचा दर एक टक्क्या‍यांपेक्षा कमी असेल तर ती जागतिक नियंत्रणात आली असल्याचे मानले जाते. मुंबईतील २४ पैकी एकाही प्रभागात रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापर्यंतही नाही. सर्वाधिक रुग्णवाढीचा दर ए कुलाबा फोर्ट परिसरात ०.११ टक्के आहे. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT