NCP Ashok Gawade Google
मुंबई

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला अमृता फडणवीसांवरील टीका भोवली; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे (Ashok Gawade) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल केलेले कथित आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट आले आहे. भाजपच्या महिला मोर्चातर्फे गावडेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत गावडे यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात (Police complaint filed) ५०९ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे वाशी शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर भाषण करताना अशोक गावडे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कथितरीत्या अपशब्द काढले. गावडे यांनी केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नवी मुंबईतील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांची भेट घेऊन गावडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यानंतर वाशी पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलिस आयुक्त डी. डी. टोळे यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी महिला मोर्चाच्या दुर्गा डोख यांनी लेखी तक्रार केली. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ. राजेश पाटील, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, दत्ता घंगाळे, तसेच भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT