मुंबई

जनसंपर्क अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

CD

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) ः उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर तुर्भे पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच भदाणे यांच्यावर जन्मतारखेत फेरफार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. आता काही दिवसांच्या अवधीत त्यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

कॅम्प नंबर २ मध्ये राहत असलेल्या एका महिलेला पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन भदाणे यांनी नोव्हेंबर महिन्यात दाखवले. त्यानंतर एका लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून २६ फेब्रुवारी रोजी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावरही युवराज भदाणे मध्यवर्ती पोलिसांना सापडत नसून निलंबनाच्या फाईलवर आयुक्त दयानिधी यांची सही झाली नसल्याने भदाणे यांचे निलंबनही लांबणीवर पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT