मुंबई

बारावे कचरा वर्गीकरण प्रकल्पाला आग

CD

बारावे कचरा वर्गीकरण प्रकल्पाला आग

चौकशी करण्याचे कल्याण-डोंबिवली पालिकेचे पोलिसांना पत्र

कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेला असलेल्या महापालिकेच्या बारावे सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी शुक्रवारी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड आणि कचरा प्रकल्पाला वारंवार आग लागण्याच्या घटना वाढल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने खडकपाडा पोलिसांना पत्र देत चौकशी करत दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या वाडेघरच्या दिशेने असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला १२ मार्च आणि २४ मार्च रोजी आग लागली होती. या घटनेबाबत संशय व्यक्त करत पालिका उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यास पत्र दिले होते. त्या आगीचे प्रकरण ताजे असताना आज (ता. १) पहाटे तीन वाजेच्या सुमारास बारावे येथील सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाला आग लागली. या ठिकाणी सुका कचरा असल्याने आग वाढली असून परिसरात धूर पसरला. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि काही पाण्याचे टँकर घटनास्थळी धाव घेतली होती. दुपारी बारा तासानंतरही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नेमकी आग कशामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT