मुंबई

आझाद मैदानात एसटी कामगारांचा जल्लोष

CD

मुंबादेवी, ता. ७ (बातमीदार) ः न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य झाल्याने गुरुवारी आझाद मैदानात त्यांनी विजयोत्सव साजरा केला. कामगारांनी आपले नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून राजेशाही थाटात निर्णयाचे स्वागत केले. ‘एक मराठा... लाख मराठा’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. जवळपास पाच हजार कामगार जल्लोषात सहभागी झाले होते.

पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने गुरुवारी मान्य केल्या. एसटी कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि बोनस देण्याचे सरकारने जाहीर केले. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, की न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून त्याची प्रत मिळाल्याशिवाय आंदोलनाबाबत मी काहीही बोलणार नाही. निकालपत्रात एसटीच्या विलगीकरणाबाबत स्पष्टपणे नमूद करीपर्यंत एकही एसटी कामगार कामावर हजर होणार नाही. सरकारने दिलेली डेडलाईन आम्ही पाळत नाही. आम्हाला आदेश देणारे हे कोण, असा सवालही त्यांनी केला. निकालपत्र वाचल्याशिवाय एकही कामगार आझाद मैदान सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ... जय रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, एक मराठा... लाख मराठा आणि जय श्रीरामच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. आझाद मैदानात जवळपास पाच हजार कामगार उपस्थित होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपोषणाला बसलेल्या २५ कामगारांना ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी लिंबूसरबत पाजून त्यांचे उपोषण सोडले.

...तोपर्यंत संप सुरूच
न्यायालयाच्या आदेशानंतर आज एसटी कर्मचारी संप मागे घेतील अशी अपेक्षा होती; मात्र कामगारांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर एक वेगळीच भूमिका मांडली. न्यायालयाच्या आदेशाची प्रत वाचत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT