मुंबई

नवी मुंबईत मुलांच्या लसीकरणाला वेग

CD

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर आता प्रशासनाने १२ ते १४ वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे. यासाठी पालिकेकडे ९२,८०० लसमात्रा उपलब्‍ध असून सुमारे ४३,३४५ जणांचे लसीकरण झाले आहे. १६ मार्चपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून ४७,४५९ लाभार्थी असून पहिली मात्रा ३६,८२१ तर दुसरी मात्रा ६,५२४ जणांना देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयोगटात लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्रेचे १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरणही पूर्ण केले आहे. आता १२ ते १४ वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे. पहिल्या मात्रेचे लसीकरण शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात बुधवारपासून दुसरी लसमात्रा देणे सुरू केले. मात्र पहिल्या दिवशी एकही लाभार्थी लसीकरण केंद्राकडे फिरकला नाही. त्यानंतर पुढील दोन ते चार दिवस अत्यंत कमी लसीकरण होत होते. मात्र देशात पुन्हा करोना रुग्णवाढीचे संकेत मिळाल्यानंतर लसीकरणाला गर्दी होऊ लागली आहे. अद्याप ६,५२४ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाने महापालिकेच्या रुग्णालयांसह पालिका व खासगी शाळा मिळून २०८ शाळांत लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. लहान मुलांच्या वेगवान लसीकरणासाठी पालिकेने २०४ शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन केले असून आतापर्यंत ९२,८०० कोर्बेवॅक्स लसमात्रा मिळाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दुसऱ्या लसमात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

37 वर्षं गायब आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेली मराठी अभिनेत्री; ऋषी कपूर यांच्यावर केलेले आरोप !

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

SCROLL FOR NEXT