मुंबई

मोरा कोळीवाड्यात घरांसाठी जागा अपुरी

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : उरण तालुक्यात असलेल्या मोरा कोळीवाड्यातील नागरिकांना गावठाणात घरे बांधण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. यामुळे संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण मोरा गावठाणाचा विस्तार करण्याची मागणी मोरा ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले.
मोरा गावाशेजारी बंदर, बोटी पार्किंगच्या जागांचा सर्व्हे करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोकळ्या जागा, मासळी मार्केट, बंदर, मासे सुकवण्याच्या जागा यांचे सीमांकन करून घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून देण्याची मागणी मोरा ग्रामस्थांनी प्राधान्यक्रमाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. या निवेदनात उरणच्या मोरा कोळीवाड्याचे सीमांकन होणे ही सर्व नागरिकांची मागणी असून, त्याबाबतीत जाहीर ठराव घेऊन करण्यात आला आहे. दोन हजार वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले मोरा बंदर आता वाढत्या नागरीकरणाच्या कचाट्यात सापडले आहे. नव्याने विकसित जेएनपीटी बंदर हे मोरा मच्छीमार बंदराच्या सागरी मच्छीमार क्षेत्रात उभारले आहे. त्यामुळे येथील मासेमारी आणि कोळीबांधव बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. त्याचप्रमाणे शिवडी सी लिंकसह अनेक सी-लिंक प्रकल्पांमुळे आणि नवी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका, पनवेल महापालिका यांचे प्रदूषित गटाराचे पाणी, एमआयडीसीचे रसायनमिश्रित पाणी यामुळे येथील मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे. या व्यवसायासह येथील स्थानिक नागरिकांच्या घरांचाही प्रश्न तितकाच गंभीरपणे जाणवू लागला आहे.
***
मोरा कोळीवाड्यामध्ये कोळीवाड्याचा सोशल इम्पॅक्ट सर्व्हे न करता जेटीचे अनधिकृत बांधकाम चालू आहे. त्यामुळे मच्छीमारांचे मोरा बंदर उद्‍ध्वस्त होऊन मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. येत्या १५ दिवसांत जिल्हाधिकारी यांनी सर्व्हे न केल्यास मच्छीमार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
- प्रशांत कोळी, अध्यक्ष, मोरा कोळीवाडा ग्रामविकास समिती

मोरा कोळीवाडा सम्राट अशोककालीन आंतरराष्ट्रीय बंदर असून, तेथे बौद्धकालीन लेणीही आहेत. याचे पुरातत्वीय महत्त्व लक्षात न घेता रो-रो जेटीचे काम सुरू आहे. यामुळे कोळीवाड्यातील घरांना धोका संभवतो. म्हणूनच मोरा कोळीवाड्याचा गावठाण विस्तार सरकारने मंजूर करणे गरजेचे आहे.
- राजाराम पाटील, गावठाण विस्तार चळवळीचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT