Aditi Tatkare Sakal
मुंबई

Aditi Tatkare : रोजगार निर्मिती हाच विकासाचा रोल मॉडेल

Shrivardhan Vidhan Sabha : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोजगारनिर्मितीला प्राधान्य देत आदिती तटकरे यांनी विकासाच्या विविध योजनांची मांडणी केली. पर्यटन, उद्योग व पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे या भागात रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन आदिती तटकरे

अलिबाग पाच तालुक्यांत पसरलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील बहुतांश भूभाग डोंगराळ आहे. निसर्गसंपन्न असलेल्या या भागात सध्या रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने गावांतील ७० टक्के तरुणांनी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर केले आहे. मतदारांनी दुसऱ्यांना आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर बेरोजगारीची समस्‍या प्राधान्याने दूर करण्याचे माझे आद्य कर्तव्य आहे.

भविष्यात इतर भागातील लोक याठिकाणी नोकरी-व्यवसायासाठी यावेत, इतके सामर्थ्‍य या‍ भूमीत असल्‍याचा विश्वास श्रीवर्धन विधानसभेच्या आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्‍त केला.दिघी पोर्ट इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या माध्यमातून ही विकासगंगा वाहण्यास काही दिवसातच सुरुवात होईल. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या असून अनेक उद्योगांनी याठिकाणी येण्यास रस दाखवला आहे.

उद्योग आणि पर्यटन उद्योगातून हा विभाग लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. याची सुरुवात झाल्यानंतर या मतदारसंघातील अन्य समस्याही दूर होतील. या भागात पाणी, जमीन विपुल प्रमाणात आहे. दिघी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे यांसारख्या दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत.

त्याचबरोबर उद्योगवाढीसाठी सर्वांत महत्त्वाचा असणारा कुशल कामगार येथे सहज उपलब्ध होणारा आहे. सध्या बहुतांश सुशिक्षित कामगार वर्ग इतर शहरांमध्ये जाऊन आपले नशीब अजमावत आहे. त्यांना परत आपल्या गावाकडे येण्याचे आवाहन करणार आहे. आपल्या गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात उद्योगवाढीसाठी वाव असल्याने याचा फायदा स्‍थानिकांना नक्‍कीच मिळेल.रोजगारासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्‍याने गावे ओस पडली आहेत.

बहुतांश गावात वयोवृद्धच राहत असून खडतर जीवन जगत आहेत. या गावात शाळा आहे; पण विद्यार्थी नाहीत. शेती आहे; पण शेती करण्यासाठी माणसे नाहीत. गावात जाण्यासाठी रस्ते आहेत; परंतु रस्त्यावर रहदारी नाही, अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे. निसर्गाने भरभरून दिले असताना केवळ रोजगार नाही म्हणून अनेक तरुण हे नंदनवन सोडून शहराची वाट धरू लागले. आता वेळ आली आहे त्यांना परत गावाकडे परतण्याची.

शेती, बागायती, मासेमारी, पर्यटन आणि उद्योग-व्यवसायातून तरुणांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन महाराष्ट्रातील लाखो तरुणांना येथे रोजगारासाठी सामावून घेण्याची क्षमता आहे. तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध झाल्यानंतर ते गावातच राहून गावाच्या विकासाला हातभार लावतील, यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. श्रीवर्धनची लोकप्रतिनिधी म्‍हणून या योजना सत्यात उतरण्याची जबाबदारी माझी आहे.

श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाचे ब्रॅंडिंगपर्यटन हे येथील उत्पन्नाचे मुख्य साधन होत आहे. हिरवेगार डोंगर, अथांग समुद्र, लेण्या, किल्ले, ऐतिहासिक मंदिरे यांच्या माध्यमातून येथे पर्यटन व्यवसाय बहरत आहे. श्रीवर्धनच्या पर्यटनाची खास ओळख आहे. त्यास अधिक प्रसिद्धी मिळावी, यासाठी योजनाबद्दल ब्रॅडिंग केले जात आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर येथे काही प्रकल्प राबवण्यात आलेले आहे.

त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येथील पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देत पर्यटनवाढीतून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. उद्योगांना रेड कार्पेटदिघी पोर्ट इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसाठी पाच हजार हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. यातील बहुतांश संपादन झालेले असून लेदर पार्क, बल्क फार्मा पार्क यांसारख्या उद्योगांबरोबर अन्य उद्योगसंस्था येथे कारखाने सुरू करण्यास रस दाखवत आहे.

हे उद्योग प्रदूषणविरहीत असतील, ही मुख्य अट ठेवून येथे येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकले जात आहे. येथे उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले जात असून त्यास येथील तरुण वर्ग सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

आरोग्य सुविधांना बळकटी

येथील बहुतांश गावात वयोवृद्ध मंडळीच राहतात. गावात वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाता येत नाही. पालकमंत्री असताना येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देत तेथे आरोग्य सुविधा बळकट केली आहे. तरीही येथे अद्ययावत उपचार सुविधांचा अभाव आहे. पुढील कालावधीत येथील आरोग्य सुविधेवर काम केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT