मुंबई

पालीतील विद्यार्थ्यांचा नवी मुंबईत अभ्यास दौरा

CD

पालीतील विद्यार्थ्यांचा नवी मुंबईत अभ्यास दौरा
विविध संधींची अद्ययावत माहिती; ३१ विद्यार्थ्यांचा सहभाग
पाली, ता. १८ (वार्ताहर) ः अकॅडेमिया स्कूल ऑफ बिझनेस स्टडीस (एएसबीएस ) व शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पालीवाला महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी नेरूळ येथील तेरणा ग्लोबल बिझनेस, तर वाशी येथील ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे अभ्यास दौरा केला. आगामी काळात व्यवसाय व नोकरीसंदर्भात विविध संधींच्या अद्ययावत माहितीसाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
या वेळी अकॅडेमिया स्कूल ऑफ बिसनेस स्टडीस यांच्या वतीने तेरणा ग्लोबल बिजनेस संस्थेत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचे माजी अधिकारी आणि अप्सकेल एज्युकेशनचे संस्थापक अतुल जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, औद्योगिक क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, मानव संसाधन, वित्तीय व्यवस्थापन, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, डिजिटल मार्केटिंग मॅनेजमेंट, इतर अनेक क्षेत्रात आगामी काळात मोाठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध होणार आहेत. यासाठी एमबीएच्या विविध गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन त्‍यानी केले. तसेच नवी मुंबई येथील तेरणा ग्लोबल बिझिनेस या महाविद्यालयालयातील व्यवस्थापन समितीचे प्रमुख आशीष चोडणकर यांनी महाविद्यालयात उपलब्ध असणारे एमबीएचे सर्व अद्यावत कोर्स संदर्भात सविस्तर माहिती दिली. या अभ्यास दौऱ्याचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र शासनचे माजी प्रतिनिधी सौरभ सुभेदार यांनी केले. या अभ्यास दौऱ्यासाठी एमबीए मध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी व अभ्यास दौऱ्यासाठी शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या अभ्यास दौऱ्याचे संपूर्ण नियोजन पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर, वाणिज्य विभागाचे प्रा. संतोष भोईर, प्रा. कृष्णा जांबेकर यांनी केले. पाली आणि आजूबाजूच्या शहरातील महाविद्यालयांना आणि तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी अतुल जोशी- ८२८६९९८२८६
व सौरभ सुभेदार- ९०२१३०८२९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT