मुंबई

अभिजात मराठी भाषेचा सार्थ अभिमान

CD

अभिजात मराठी भाषेचा सार्थ अभिमान
अक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेख

पाली, ता. २६ (वार्ताहर)ः नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे अक्षीचा शिलालेख हा मराठी भाषेतील सर्वात प्राचीन लेखनाचा पुरावा आहे. इ. स. १०१२ म्हणजेच शके ९३४ मध्ये कोरलेला हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबाग-चौल मार्गावरील अक्षी गावात मराठी भाषेचा अभिमान जोपासत उभा आहे. इतिहास व भाषा अभ्यासक, स्थानिक आणि पर्यटक या ऐतिहासिक ठेव्याला भेट देतात.

अक्षीचा शिलालेख हा ऐतिहासिक ठेवा रायगड जिल्ह्यातील एक सुवर्ण मुकुटच आहे. शिलाहार राजा पहिला केसी देवराय यांच्या काळात हा शिलालेख लिहिला गेला असून, त्याचा प्रधान भइर्जू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दान केल्याचा उल्लेख आहे. अक्षी शिलालेख हा मराठी भाषेचा पहिला लिखित पुरावा असल्यामुळे तो मराठी भाषेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा शिलालेख शिलाहार राजवटीतील सामाजिक, धार्मिक आणि प्रशासनिक घटकांचा तसेच मराठी भाषेच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. आजही हा शिलालेख अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असून, अभिजात मराठीचा अभिमानास्पद पुरावा म्हणून मानला जातो.

मराठी भाषेचा पहिला लिखित पुरावा
पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे मराठीतील पहिला शिलालेख आहे. शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेत आहे. यातील लिपी देवनागरी आहे. याआधी मराठी भाषेचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे मराठी भाषा ११व्या शतकातच राजकीय आणि प्रशासकीय व्यवहारासाठी वापरली जात होती, याचा पुरावा मिळतो. लिपी आणि लेखनशैलीच्या दृष्टिकोनातून हा लेख महत्त्वाचा आहे. यामुळे मध्ययुगीन मराठी लिपीच्या विकासाचा अभ्यास करता येतो. प्राचीन देवनागरी लिपी आणि लेखनशैली याद्वारे कळते.

कालखंड व ऐतिहासिक संदर्भ
अक्षीतील शिलालेख शिलाहार राजवंशाच्या काळातील आहे. शके ९३४ (इ. स. १०१२) चा स्पष्ट उल्लेख आहे. कोकण प्रांतातील शिलाहार राजाची सत्ता आणि त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचे यावरून आकलन होते. शिलाहार राजवटीत सामाजिक आणि धार्मिक जीवनात राजा आणि त्याच्या प्रशासनाने धार्मिक संस्थांना मदत केली. बोडणासाठी धान्य दान करणे हे त्या काळातील सामाजिक-धार्मिक परंपरेचे दर्शन घडवते. शिलालेखाचा मजकूर नऊ ओळींचा असून, त्यावर चंद्र-सूर्याचे कोरीव चित्र आहे. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे, जे प्रामुख्याने मध्ययुगीन शिलालेखांमध्ये आढळते.

शिलालेखाचा अर्थ
शिलालेखातील मजकुराचा साधारण अर्थ असा आहे, की पश्चिम समुद्राधिपती कोकण चक्रवर्ती श्री केसी देवराय यांच्या महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक ९३४, अधिक कृष्ण पक्ष, शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले.

अभ्यासकांमध्ये मतभेद
काही अभ्यासकांच्या मते, श्रवणबेळगोळ येथील श्री चामुंडराये करवियले हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख आहे. तथापि, डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार अक्षीचा शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो.
मराठी भाषेचा सार्थ अभिमान असलेला हा ऐतिहासिक ठेवा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. राज्यभरातून या ठिकाणी पर्यटक व अभ्यासक भेट देतात. मात्र जिल्ह्यातील अनेक लोकांना याबाबत फारशी माहिती नाही. स्थानिकांना याबाबत अधिक माहिती देऊन त्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.

पाली ः अक्षी येथील शिलालेख (फोटो समीर मालोदे पाठवणार आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT