सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीच्या अध्यक्षपदी दीपक पवार
पाली, ता. १७ (वार्ताहर) ः सुधागड तालुका बौद्धजन पंचायत संस्थेच्या मध्यवर्ती कमिटी अध्यक्षपदी दीपक भीमराव पवार यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी नरेश शिंदे, उपाध्यक्षपदी रोहिणी जाधव, खजिनदार विठ्ठल बैकर, सहसचिव राहुल कांबळे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, पाली येथे पार पडली.
सुधागड तालुका बौद्धजन पंचायत र. नं २७५६ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुधागड तालुक्यात कार्यरत आहे. तालुक्याचे काम मध्यवर्ती कमिटी व ठाणे, मुंबई, पुणे आदी शहरी भागांचे काम सुप्रीम कमिटी पाहते. बौद्धजन पंचायत ही संस्था तालुक्यातील बौद्ध समाजाची धार्मिक संस्था असून, तिला मातृसंस्था म्हणून जोपासले जाते. या संस्थेची कार्यकारिणी निवड ही दर तीन वर्षांतीन लोकशाही पद्धतीने घटनेनुसार केली जाते. मध्यवर्ती कमिटीचे तालुक्यात एकूण आठ ग्रुप शाखा आहेत. या प्रत्येक ग्रुप शाखेमधून एक प्रतिनिधी व तीन महिला प्रतिनिधी अशा एकूण ११ प्रतिनिधींची मध्यवर्ती कमिटीच्या व्यवस्थापक मंडळावर निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. त्यामधून मध्यवर्ती कमिटी अध्यक्षाची निवड करण्यात आली. या वेळी दीपक पवार यांच्या नावाला सर्वानुमते पसंती देण्यात आली असून, त्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.