मुंबई

खरबाचीवाडी येथील आग विझविण्यात यश

CD

खरबाचीवाडी येथील आग विझविण्यात यश
जीवितहानी टळली; मात्र ग्रामस्‍थांचे लाखोंचे नुकसान
पाली, ता. १८ (वार्ताहर) ः सुधागड आणि रोहा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या खरबाचीवाडी येथे वणव्याचे उग्र आगीत रूपांतर झाले होते. या आगीत ग्रामस्‍थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वेळी अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने आगीला रोखण्यात यश आल्याने संपूर्ण वाडी पेटण्यापासून वाचली.
खरबाचीवाडी परिसरात वनव्याने अचानक पेट घेतला. गावातील सुकलेल्या फणसाच्या वृक्षाने पेट घेतल्याने येथील गुरांच्या गोठ्यापर्यंत आग पसरली. काही वेळातच गोठ्यातील पेंढ्याने पेट घेऊन आगीने उग्ररूप धारण केले. रोहावरून अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. गुरांच्या वाड्याशेजारील घरांना आग लागण्यास सुरुवात झाली होती. या वेळी ग्रामस्‍थांनी प्रसंगावधान दाखवत आग लागलेल्या घरातील सिलिंडर टाक्या बाहेर काढून अनर्थ टाळण्यात आला. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र या वणव्यात मधुकर कदम यांचा वाडा त्यातील पेंढी जळून खाक झाले. तसेच शेतकरी शरद गोळे यांची ५० आंब्याची झाडे जळाली. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या काही दिवसांत सुधागड आणि रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. हे वणवे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. ज्यांच्या हलगर्जीमुळे हे वणवे लागत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असे माजी सरपंच शरद शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT