मुंबई

वयोवृद्धांच्या संरक्षणासाठी वावडुंगी वरचीवाडीत सीसीटीव्ही

CD

वयोवृद्धांच्या संरक्षणासाठी वावडुंगी वरचीवाडीत सीसीटीव्ही
अलिबाग, ता. २७ : ग्रामीण तसेच शहरातील वयोवृद्ध नागरिकांची सुरक्षा सध्या एक चिंतेचा विषय झाला आहे. त्यातच चोरीचे प्रकार वाढत असल्याने गावात सीसीटीव्ही लावणे ही काळाची गरज झाली आहे; मात्र यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता मुरूड तालुक्यातील वावडुंगी वरचीवाडी येथील सचिन भुवड यांच्या प्रयत्नातून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण १६ मार्च रोजी करण्यात आले
नोकरीनिमित्त घरातील कर्ता दिवसभर बाहेर असल्याने वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर पर्याय म्हणून वावडुंगी वरचीवाडी ग्रामस्थांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष सचिन भुवड यांनी पुढाकार घेत या कामासाठी अर्धी रक्‍कम दिली, तर उर्वरित ग्रामस्थांच्या स्वखर्चातून त्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली. त्यांच्या या कार्याचे १८ गाव कुणबी समाजात, तसेच मुरूड तालुक्यात कौतुक होत आहे. लोकापर्ण सोहळ्याच्या वेळी मुंबईकर मंडळाचे कार्यध्यक्ष (गावप्रमुख) नितीन भुवड, सहसचिव भावेश भुवड, संदीप भेकरे तसेच मुंबईवरून आलेले शैलेश कदम यांच्यासह मुंबईकर मंडळ वावडुंगी वरचीवाडी, ग्रामस्थ मंडळ, एकता महिला मंडळ, संलग्न जय हनुमान क्रिकेट संघ वावडुंगी वरचीवाडीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT