मुंबई

दूषित पाण्यामुळे आरोग्‍य धोक्‍यात

CD

पाली, ता. १० (वार्ताहर) ः पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्‍या असून, आतून गंजल्या आहेत. काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ व काळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्‍याने बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खडकआळी येथील नळांना महिनाभरापासून काळ्या रंगाचे दूषित पाणी येत आहे. नळाला पाणी आल्यावर सुरुवातीचे काही वेळ काळे पाणी येते, त्यानंतर थोडे स्वच्छ पाणी येते. मध्यंतरी बल्लाळेश्वर नगर, प्रबुद्ध नगर आदी ठिकाणीही गढूळ, शेवाळेयुक्‍त पाणी येत होते. अशुद्ध व दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहेत. यावर उपाययोजना म्हणून नगर पंचायतीतर्फे उन्हेरे धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडण्यात आले आहे, मात्र तरीही नळांना येणारे पाणी गढूळ असल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

शुद्धीकरण प्रक्रिया न करताच पुरवठा
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, कचरा टाकला जातो. तसेच वाळू उपसाही होतो, शिवाय शुद्धीकरण प्रक्रिया न करताच थेट नळाद्वारे पाणी सोडण्यात येत असल्‍याने नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपन्यांमधील दूषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट अंबा नदीपात्रात सोडण्यात येते. किनाऱ्यालगतच्या गावांतील महिला नदीवर धुणीभांडी करतात. नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेही पाण्याला उग्र दुर्गंध येतो, शिवाय चवही खराब लागते.


अंबा नदीचे पाणी थेट नळाद्वारे नागरिकांना वितरित केले जाते. या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया केली जात नाही. पाली हे अष्टविनायक क्षेत्र असून, बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. पालीतील स्थायी लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे नेहमीचेच आहे. पाली शहरासाठी प्रस्‍तावित करण्यात आलेली २७ कोटी रुपयांची शुद्ध पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून लालफितीत अडकली आहे.


जलवाहिन्या जुन्या झाल्‍याने आतून गंजल्‍या आहेत. त्यांची दुरुस्ती करणे अवघड जाते. शिवाय, अनेक जलवाहिन्यांमध्ये कचरा, शेवाळ साचले आहे. पाणीपुरवठा सुरू केल्यावर कचरा, शेवाळे, माती नळाद्वारे घराघरांत जाते. शहरातील शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहोत.
- प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली


जलवाहिनी गंजली असून, काही ठिकाणी फुटली आहे. खडकाळी येथे गटाराचे काम सुरू असल्यामुळे नळाला काळे पाणी येत होते, मात्र दुरुस्‍ती केल्‍याने तसेच उन्हेरे धरणाचे पाणी अंबा नदीला सोडल्यामुळे स्वच्छ पुरवठा होईल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.
- प्रतीक्षा सुबोध पालांडे, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती, पाली

नळाला अतिशय दूषित, दुर्गंधीयुक्त व काळे पाणी येत आहे. पूर्ण शहरातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्‍याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
- महेश बारमुख, शिक्षक, नागरिक, पाली

पाली ः नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT