मुंबई

शहरातील अतिक्रमणामुळे पालीकर त्रस्‍त

CD

शहरातील अतिक्रमणामुळे पालीकर त्रस्‍त
नगर पंचायत प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः शहरातील हटाळेश्वर चौक ते बसस्थानक रस्त्यावरील व्यापारी अतिक्रमण हटविण्याची मागणी पालीतील नागरिकांनी केली आहे. यासाठी शेकडो सह्यांची मोहीम राबवत नगर पंचायत कार्यालयाला निवेदन सादर केले होते. नागरिकांनी वेळीच कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र १५ दिवस उलटूनही नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्‍या सोमवारी (ता. १९) नगर पंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले आहे.
पालीमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. पर्यटक तसेच वाढती लोकसंख्या यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्‍यातच शहरातील हटाळेश्वर चौक ते बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी नगर पंचायत प्रशासनाकडून येथील गाळेधारक व व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडील वाढीव बांधकामाची कागदपत्रे मागवण्यात आली होती; मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पूर्वीच्या अनुभवानुसार, नोटिसा पाठवल्यानंतरही कारवाई होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी नगरसेवक आणि प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करीत अतिक्रमण हटविण्यात होणाऱ्या दिरंगाईला आळा घालण्याची मागणी केली आहे. अतिक्रमणामुळे अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालीकरांकडून केली जात आहे. नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
...................
व्यापाऱ्यांना व गाळेधारकांना वाढीव बांधकामासंदर्भात संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आतापर्यंत तीन नोटिसा पाठवल्या आहेत. अजूनही काहींनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. या विषयासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. आलेली कागदपत्रे पडताळली जातील, त्यामध्ये त्रुटी आढळल्यास तसेच ज्यांनी कागदपत्रे दिली नाहीत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Nishikant Dubey : मराठी जनतेचा अपमान; मनसेची खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस

'वॉर 2' चा धमाकेदार पोस्टर रिलीज, हृतिक, ज्युनियर एनटीआर, कियाराची जबरदस्त झलक!

Buldhana Crime : अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून; पेनटाकळी धरणात आढळला होता मृतदेह, आरोपीला अटक

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेस्ला इलेक्ट्रिक कारमध्ये सवार!

SCROLL FOR NEXT