मुंबई

उद्याच्या भविष्यासाठी आज धडपड

CD

अलिबाग, ता. २४ (वार्ताहर)ः जन्माला आलेले एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेत १४३ शाळाबाह्य, २०४ स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी १ जुलै ते १५ जुलै यादरम्यान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्थांना भेटी देताना शाळाबाह्य, स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेत १४३ शाळाबाह्य मुले तर रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या २०४ मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
----------------------------------------------
रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रम तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आयएसओ मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, माध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा उपक्रमांची अंमलबजावणी तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे.
------------------------------
शाळाबाह्य : १४३
७७ मुले, ६६ मुली
---------------------------------
स्थलांतरित : २०४
१०५ मुले, ९९ मुली
--------------------------------------
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेअंतर्गत तीन ते सहा वयोगटातील बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत. तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनियर केजी, सीनियर केजीमध्ये जात नाहीत. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली.
- नेहा भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी
------------------------------
शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबवण्यात आली.
- ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, राजिप
------------------------------------------------------------

\

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

Rahul Gandhi Mohammad Irfan : कोण आहे हा मोहम्मद इरफान? राहुल गांधी भेटायला थेट घराकडं गेल; म्हणाले, 'देशाची खरी ताकद युवा'

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

बहीण आशा भोसलेंच्या फोटोला कधीच हार घालत नाहीत उषा मंगेशकर; सांगितलं मोठं कारण

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

SCROLL FOR NEXT