मुंबई

रायगडमध्ये ४० हुन अधिक गोविंदा जखमी

CD

रायगडमध्ये ४० हून अधिक गोविंदा जखमी
कर्जत, ता. १७ (बातमीदार): रायगड जिल्ह्यात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदांच्या उत्साहात थर रचण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत ४० हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. अलिबाग तालुक्यात सहा गोविंदा किरकोळ जखमी झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात जखमींची संख्या ४० हून अधिक झाली आहे. जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कर्जतमधील १५ वर्षीय ध्रुव मनोज गुप्ता याला पाचव्या थरावरून पडल्याने गंभीर दुखापत झाली; मात्र वैद्यकीय चाचण्यांनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. कर्जत शहरातील पाटील आळी मित्र मंडळ हे गोविंदा पथक उत्सवात सहभागी झाले होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कदम वाड्यासमोर दहीहंडी फोडताना ध्रुव हा पाचव्या थरावरून थेट काँक्रीट रस्त्यावर पडला. तत्काळ त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले व नंतर पुढील उपचारांसाठी पनवेल येथील गांधी रुग्णालयात हलवण्यात आले. सायंकाळी उशिरा करण्यात आलेल्या एमआरआय व सीटी स्कॅन अहवाल सामान्य आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पथकाच्या सदस्यांनी एक भावनिक आणि आदर्श निर्णय घेतला आहे.

पथकाचे सदस्य प्रशांत चंदन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पथकाने दहीहंडी स्पर्धेत जिंकलेली संपूर्ण पारितोषिकाची रक्कम (सुमारे एक लाख रुपये) ध्रुवच्या पुढील उपचारासाठी दिली जाणार आहे. उत्सवाच्या गडबडीतही पथकाने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि एकजूट शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahad Chavdar Lake : महाडमध्ये संताप! ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पायऱ्यांवरून फिरवला जेसीबी; डॉ. आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

चीफ जस्टीसच्या खंडपीठासमोर सुनावणीत धक्कादायक घटना; अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ अन्... न्यायालयात खळबळ

Chanakya Life Tips : लवकर यशस्वी व्हायचंय? 'या' 4 गोष्टी कधीच कुणाशी शेअर करू नका, मनातलं सगळं सांगत बसलात तर नुकसान पक्कं

राजा शिवाजी सिनेमाच्या नावात छत्रपती का नाही? रितेश देशमुख म्हणाला...

Massajog Election: मस्साजोगचे विजयी उमेदवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीला! आई भावुक; म्हणाल्या, गुलाल उधळला...

SCROLL FOR NEXT