मुंबई

जिल्हा परिषद शाळांतील परसबाग बहरल्या

CD

जिल्हा परिषद शाळांतील परसबाग बहरल्या
पौष्टिक भाज्यांचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश
पाली, ता. १३ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये परसबागा बहरल्या असून, त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला होत आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत राजीव गांधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच्छापूरने प्रथम क्रमांक पटकावला, तर राजीव गांधी जिल्हा परिषद शाळा सागवाडीने द्वितीय आणि राजीव गांधी जिल्हा परिषद शाळा तिवरेने तृतीय क्रमांक मिळवला. या तीनही शाळांची जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच सिद्धेश्वर, रासळ आदिवासीवाडी आणि भेलीवसावे येथील जिल्हा परिषद शाळांना उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले. तालुका स्तरावरून या परसबागांचे परीक्षण करण्यात आले. गटविकास अधिकारी लता मोहिते, गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, विस्तार अधिकारी व पोषण अधीक्षक नवनाथ साबळे यांनी सर्व विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. पेडली व नाडसूर केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल राणे यांनी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळांच्या परिसरात विकसित करण्यात आलेल्या या परसबागांमध्ये भेंडी, गवार, वांगी, पालक, दुधी, शिराळे, कारले, टोमॅटो तसेच विविध फळे व फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. शिक्षक व विद्यार्थी मिळून या परसबागांची निगा राखत असून, येथील ताज्या व रसायनमुक्त भाज्यांचा वापर मध्यान्ह भोजनात केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आवडीने व उत्साहाने भाजीपाला खात आहेत.
.................
पोषण आहाराला चालना
केंद्रप्रमुख अनिल राणे यांनी सांगितले की, परसबागेमुळे विद्यार्थ्यांना ताजा व पौष्टिक भाजीपाला मिळतो. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने भाज्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण होते. स्वतःच्या कष्टातून पिकवलेल्या अन्नाचे महत्त्व मुलांना उमगते. या परसबागा शाळेच्या जवळ असल्याने देखभाल सुलभ होते. कमी जागेत अधिक उत्पादन, पर्यावरणपूरक पद्धती, पोषण आहाराला चालना आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण अशी अनेक वैशिष्ट्ये या उपक्रमातून साध्य होत असून, हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar AI Video: अजित पवारांच्या आवाजात खोटा एआय व्हिडीओ केल्यास कडक कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र

Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Latest Marathi News Live Update : अजित पवारांच्या आवाजात खोटे ‘व्हिडीओ’ बंद करावेत – तटकरे

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

SCROLL FOR NEXT