मुंबई

सुधागडमधील नाडसूर, पाच्छापूर, अडुळसे ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

CD

सुधागडमधील नाडसूर, पाच्छापूर, अडुळसे ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाली, ता. ५ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) इनकमिंगचा ओघ सातत्याने सुरू आहे. तालुक्याच्या राजकारणात पक्षाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. नुकतेच नाडसूर, पाच्छापूर (आसानेवाडी) आणि अडुळसे (गौळमाळ) या ग्रामपंचायतींमधील शेकापचे विद्यमान सदस्य व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश पार पडला. विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच योग्य पर्याय असल्याची भावना प्रवेशकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. खासदार सुनील तटकरे यांनी पक्षात दाखल झालेल्या सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, सुधागड तालुक्याच्या विकासासाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन केले. या प्रवेशामुळे नाडसूर ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरण पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकले आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले असले, तरी सरपंचपद मात्र पक्षाला मिळू शकले नव्हते. मात्र, आता शेकापचे तीन विद्यमान सदस्य राष्ट्रवादीत दाखल झाल्याने पक्षाचे संख्याबळ निर्णायक ठरले आहे. त्यामुळे एकेकाळी ‘हरलेली’ मानली जाणारी ग्रामपंचायत पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यात पक्ष नेतृत्वाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

सोलापुरातील ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरचा लळा! कलेक्टर, सीपी, ॲडशनल एसपींचा कार्यकाळ पूर्ण; ५ अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार, वाचा...

SCROLL FOR NEXT