मुंबई

संविधानाचे निष्ठेने पालन करा

CD

संविधानाचे निष्ठेने पालन करा
भरत गोगावले यांचे प्रजासत्ताकदिनी नागरिकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ ः संविधानाचे निष्ठेने पालन करून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जपत रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले. प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे गोगावले यांच्या हस्ते ध्वज फडकावून मानवंदना दिली. या वेळी ते बोलत होते
याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनानिमित्त शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलिस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल आणि विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला होता.
भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, कृषी, औद्योगिक विकास, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत सातत्याने भरीव काम सुरू आहे. सराकारच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

विविध पुरस्कार व सत्कार समारंभ
विक्रम नवरखेडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून राधाकृष्ण बिश्नोई, सिद्धार्थ ठाकूर, विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला. मेरा युवा भारत, रायगड यांच्यामार्फत जलतरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सारा वर्तक हिचा सन्मान करण्यात आला. उपवनसंरक्षक अलिबाग यांच्याकडून उल्लेखनीय आणि गौरवास्पद कामगिरीसाठी पोलिस निरिक्षक, वाहतूक शाखा अभिजीत भुजबल, पोलिस निरिक्षक किशोर साळे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील, वनपाल तुकाराम जाधव, वनपाल अशोक काटकर या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

क्रीडा पुरस्काराने सन्मानित
उत्तर प्रदेशमधील जांबोरी येथे रायगडमधील कारमेल कॉन्व्हेंट स्कूल या शाळेतील २५ स्काऊट गाईड व तीन शिक्षक यांनी संचालनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल शिक्षण अधिकारी यांच्याकडून शाळेला सन्मानित करण्यात आले. ओंकार पवार (कुस्ती), सार्थक इंद्रे (वॉटरपोलो), ऋषिकेश मालोरे (वुशू), सलोनी मोरे (पॉवरलिफ्टिंग), अमृता भगत (पॉवरलिफ्टिंग), अन्वी राठोड (रायफल शूटिंग), प्रवीण खुटारकर (ॲथलेटिक्स), सचिन माळी (वूशू मार्गदर्शक), अरविंद शिंदे (जिम्नॅस्टिक्स), श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक्स), श्रेयस पराडकर (जलतरण दिव्यांग), प्रमोद कुमार (टेबल टेनिस) यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT