मुंबई

मच्छीमारांच्या 11 वर्षांच्या लढ्याला यश रामदास कोळी यांना दिल्लीत ''फाईट फॉर जस्टिस'' पुरस्कार बाधित मच्छीमारांना प्रत्येकी ५.४० लाख

CD

रामदास कोळी यांना दिल्लीत `फाईट फॉर जस्टिस’ पुरस्कार
पाली, ता. १४ (वार्ताहर) ः औद्योगिक प्रकल्पांच्या विस्तारामुळे उरणमधील स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा आली होती. या अन्यायाविरोधात ज्येष्ठ मच्छीमार रामदास कोळी आणि पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीने पुकारलेल्या ११ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, रामदास कोळी यांना दिल्लीत प्रतिष्ठेच्या ‘फाईट फॉर जस्टिस अवॉर्ड २०२५’ने सन्मानित करण्यात आले आहे.
उरण, कोळीवाडा, शेवा, गव्हाण आणि बेलपाडा या गावांतील मच्छीमारांचे जीवन औद्योगिक प्रकल्पांच्या विस्तारामुळे धोक्यात आले होते. याविरोधात रामदास कोळी आणि पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना लवादाने संबंधित कंपन्यांवर कडक ताशेरे ओढले. नष्ट केलेल्या कांदळवनांचे त्वरित पुनर्रोपण करावे. न्हावा-शेवा खाडीतील नैसर्गिक प्रवाहातील मातीचे भराव आणि कृत्रिम अडथळे तातडीने हटवावे. सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणताही नवीन भराव करू नये आणि बाधित मच्छीमारांना प्रत्येकी ५.४० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यावरण रक्षण आणि मच्छीमारांच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालय व हरित लवादापर्यंत दिलेल्या लढ्याबद्दल रामदास कोळी यांना दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि लिव्ह फॉर फ्रीडम यांच्यातर्फे नुकतेच नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संपूर्ण कोळी समाजाचा आहे, अशी भावना कोळी यांनी या वेळी व्यक्त केली. या लढ्यात रमेश कोळी व इतर सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले.


फोटो ओळ, पाली : ‘फाईट फॉर जस्टिस'' पुरस्कारासह रामदास कोळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT