पाली नगर पंचायतीत संत गाडगेबाबांची जयंती साजरी
पाली (वार्ताहर) ः स्वच्छतादूत आणि थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती सोमवारी (ता. २३) पाली नगर पंचायत कार्यालयात उत्साहात साजरी झाली. या वेळी स्वच्छता आणि माणुसकी हाच खरा धर्म असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाली नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्ष पराग मेहता आणि नगरसेवक सुधीर भालेराव यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगर पंचायतीमधील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीदेखील या वेळी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून शहराच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.