शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठतर्फे स्थापना दिनानिमित्त १८ मे रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नावीन्यपूर्ण शेतकऱ्याला ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाने केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त कृषी संशोधन परिषदेत प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्यातील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा विस्तार शिक्षण कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे सांगितले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.