

MS Dhoni | Chennai Super Kings
Sakal
भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी म्हटलं की ७ क्रमांक सर्वांनाच आठवतो. कारण धोनीला जेव्हापासून क्रिकेट खेळताना चाहत्यांनी पाहिलंय तेव्हा तो ७ क्रमांकाच्याच जर्सीत (7 Number Jersey) दिसला आहे. त्यामुळे ७ क्रमांकाची जर्सी ही त्याची ओळखच झाली आहे.
अगदी आता तर क्रिकेटविश्वात ७ क्रमांक येणारी कोणतीही गोष्ट दिसली तरी त्याचा संबंध गमतीने थेट धोनीशी (MS Dhoni) जोडजा जातो. असं असतानाही आता तो हा क्रमांक सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.