मुंबई

सुधागडमध्ये शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर तालुकाप्रमुख पदी अनुपम कुलकर्णी, तर संपर्कप्रमुख पदी सुरज शेळके यांची नियुक्ती

CD

सुधागडमध्ये शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
तालुकाप्रमुख पदी अनुपम कुलकर्णी, तर संपर्कप्रमुख पदी सुरज शेळके यांची नियुक्ती
पाली, ता. २४ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या वतीने सुधागड तालुक्यात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. सुधागड तालुकाप्रमुख पदी अनुपम कुलकर्णी यांची, तर तालुका संपर्कप्रमुख पदी सुरज शेळके यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या हस्ते या निवडीचे नियुक्तीपत्र नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने या दोन्ही नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
अनुपम कुलकर्णी म्हणाले की, पक्षप्रमुख आणि जिल्हा नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. तर, सुरज शेळके यांनी तालुका संपर्कप्रमुख ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. पक्ष आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करताना, शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत कशा पोहोचतील, याकडे माझा विशेष कल राहील, असे सांगितले. या निवडीमुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

फोटो ओळ,
पाली ः अनुपम कुलकर्णी व सुरज शेळके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT