नेहरू स्टेडियमवर सुधागड कबड्डी स्पर्धेचा जल्लोष
श्री काळभैरव भारजे संघ विजेता
‘श्री बापूजी चषक’वर नाव कोरले
पाली, ता. १ (वार्ताहर) : पुण्यातील नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुधागडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्वयंभू हनुमान रहिवासी मंडळ, पुणे व सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री बापूजी चषक’ स्पर्धेत श्री काळभैरव भारजे संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारजे संघाने सोमजाई माता गोमाशी संघावर मात करत मानाचा चषक जिंकला, तर गोमाशी संघ उपविजेता ठरला. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले व ओम काळभैरव आपटवणे यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान मिळवले.
स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. शुभम शिंदे (सर्वोत्कृष्ट खेळाडू), सूरज मगर (उत्कृष्ट चढाई) व ऋतिक सावंत (उत्कृष्ट पकड) यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळून क्रीडाभावना वृद्धिंगत झाली.
फोटो ओळ, पाली, प्रथम पारितोषिक पटकावलेला श्री काळभैरव भारजे संघ व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.