अलिबाग येथे स्तोत्र पठण स्पर्धा
अलिबाग: मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांमध्ये वाचन-पाठांतराची सवय कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अँटीकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, रायगड टीमतर्फे स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात आली. नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेत ५० स्पर्धक सहभागी झाले. ६ ते १० वयोगटात ‘श्री मारुती स्तोत्र’मध्ये राधा आशिष गावंड प्रथम, कैवल्य विकास पाटील द्वितीय, मान्या शैलेश म्हात्रे तृतीय ठरले. ११ ते १६ वयोगटात ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’मध्ये सान्वी प्रतीश गंभीर प्रथम, ओवी संदेश गीजे द्वितीय, तेजस्विनी चितळे तृतीय ठरल्या. परीक्षक म्हणून माधव जोशी, प्रविण मोरे, प्रिया कर्णिक यांनी काम पाहिले. विजेत्यांना पारितोषिके व सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.