मुंबई

पालीत नळांना काळे जंतुयुक्त पाणी

CD

पालीत नळांना काळे जंतुयुक्त पाणी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाली, ता. १२ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील धुंडीविनायक नगर भागात मंगळवारी (ता. १२) नळांना चक्क जंतुयुक्त काळेकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो भाविक आणि स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाली शहराला अंबा नदीतून थेट, कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पात्र रसायनयुक्त सांडपाणी, कचरा आणि वाळू उपशामुळे प्रचंड प्रदूषित झाले आहे. धुंडीविनायक नगर परिसरात नळ सुरू होताच मोठ्या प्रमाणात जंतुयुक्त काळे पाणी आले. पाण्याला उग्र दुर्गंधी येत होती. यापूर्वी मागील वर्षी खडकआळी, बल्लाळेश्वर नगर आणि प्रबुद्ध नगरमध्येही असाच अनुभव नागरिकांना आला आहे.

चौकट
२७ कोटींची योजना लालफितीत
पालीची लोकसंख्या आणि येथे येणारे हजारो भाविक लक्षात घेता, २७ कोटी रुपयांची शुद्ध पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. मात्र, ही योजना अद्यापही तांत्रिक कारणास्तव लालफितीत अडकली आहे. परिणामी, शुद्धीकरणाविना थेट अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविले जात असल्याने नळांतून अनेकदा जिवंत साप, कीडे आणि चिखल बाहेर येण्याचे प्रकार घडले आहेत.

चौकट
अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा
नदीपात्रात कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी आणि शहराचे सांडपाणी थेट सोडले जात आहे. तसेच निर्माल्य व कचऱ्यामुळे पाणी कुजून त्याला दुर्गंधी येत आहे. याच दूषित पाण्याचा पुरवठा शहरात होत असल्याने जलजन्य आजारांची टांगती तलवार नागरिकांवर आहे.

कोट
धुंडीविनायक नगर भागात नळाला अत्यंत दूषित आणि काळे व जंतुयुक्त पाणी आले आहे. अशुद्ध पाण्यामुळे घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तत्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा.
राहुल महाजन, स्थानिक नागरिक, पाली

फोटो ओळ, पाली, धुंडीविनायक नगर येथे नळाला आलेले जंतुयुक्त काळेकुट्ट पाणी. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली, राहुल महाजन, स्थानिक नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT