जिल्ह्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी लावल्या काळ्या फिती
समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन; मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी आणि ‘समान काम, समान वेतन’ द्यावे, या मागणीसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवार, गुरुवारी राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. राज्यातील ३४ हजारांहून अधिक न्यायालयीन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. रायगड जिल्ह्यातील सुमारे ६८० कर्मचाऱ्यांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसह विविध मागण्यांबाबत मागील २० महिन्यांपासून शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असून, मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने दिला आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबरला राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून ३४ हजारांहून अधिक न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
२० महिन्यांपासून प्रतीक्षा
वेतनश्रेणी व समान काम, समान वेतनाच्या मागणीसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष समितीचा अहवालही शासनाला सादर झाला आहे. मात्र, मागील २० महिन्यांपासून निर्णय प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.