मुंबई

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा

CD

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा 
पाली फाटा ते इमॅजिकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांच्या वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर (क्र. ५४८ अ) वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. पाली फाटा ते इमॅजिकादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, रस्त्यावरील ताण आणि खड्ड्यांमुळे अवघ्या ५०० मीटर ते १ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग कोकणात, मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यासाठी तसेच विळे-निजामपूर मार्गे माणगावला जाण्यासाठी सोयीचा आणि जवळचा मानला जातो. याशिवाय या मार्गावरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-बंगळूर महामार्गावरही सहज पोहोचता येते. त्यामुळे हजारो प्रवासी आणि वाहनचालक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात, मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अवघ्या चार वर्षांपूर्वी सुमारे २०० कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या राज्य महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचा वेग मंदावून कोंडीत मोठी भर पडत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत प्रवासी आणि वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाकण नाक्यावरही खड्डे व कोंडीचा विळखा
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या वाकण नाक्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मुख्य नाका असल्याने अनेक प्रवासी व वाहनचालक चहा-पाण्यासाठी आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. आधीच खड्ड्यांमुळे संथ झालेली वाहतूक आणि त्यात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाकण नाक्यावरही मोठी कोंडी होत आहे.

  शनिवारी (ता. १४) पाली फाट्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होती. अवघे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आम्हाला तब्बल दीड तासांचा अवधी लागला. या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- अरिफा पठाण, प्रवासी, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

Gadchiroli Transformation : नक्षलवादाचा काळोख संपला! महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा बनणार देशाची नवी 'स्टील सिटी'; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

हातगाडीवर भाजी विकत असतानाच लेक न्यायाधीश झाल्याची बातमी कळाली... आई-वडील भावूक... कधीकाळी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठीही नव्हते ८०० रुपये!

Marathwada Water Crisis: सरकारच्या दुर्लक्षाने मराठवाड्याचे ७ टीएमसी पाणी अडकले! दोन बोगद्यांची कामे ठप्प, पंपगृहही अपूर्ण; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला ब्रेक

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT