मुंबई

वानरांचा पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ला

CD

वानराच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू
वरसोली परिसरात जनावरांवर हल्ले; वन विभागाकडून वानर जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : वरसोली गावातील बापदेव आळी आणि परिसरात पाळीव जनावरांवर हल्ले करणाऱ्या वानराला वन विभागाने रविवारी (ता. १५) सकाळी पकडले. गेल्या आठवड्यापासून या वानराने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्या हल्ल्यात आठ दिवसांच्या वासराचा मृत्यू झाला असून, एक म्हैस आणि दोन वासरे जखमी झाली आहेत. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वरसोलीतील बापदेव आळी परिसरात या वानराचा वावर होता. झाडांवर लपून बसल्यानंतर संधी मिळताच ते गोठ्यात शिरून बांधलेल्या जनावरांवर हल्ला करीत होते. जनावरांच्या तोंड, नाकाजवळ तसेच शरीराच्या अन्य भागांवर मोठे चावे घेतले जात होते. प्रशांत दत्तात्रेय वर्तक यांच्या म्हशीच्या अवघ्या आठ दिवसांच्या वासराचा या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा वानराने गोठ्यातील म्हशी आणि दोन वासरांवर हल्ला केला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला पकडण्याची मागणी केली होती. अखेर वन विभागाने प्रयत्न करून रविवारी त्याला ताब्यात घेतले.

जनावरांची प्रकृती चिंताजनक
हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वानराच्या आक्रमक वर्तनामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. वानराला पकडण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जखमी जनावरांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; दिपाली सय्यद म्हणाल्या, 'हे किती हास्यास्पद!'

उद्यापासून ६ राशींचं नशीब चमकणार! आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, धनलाभाचेही संकेत

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

ENG vs AUS, 2nd ODI: इंग्लंडचा पलटवार! गस ऍटकिन्सनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, तब्बल १३५ धावांनी पराभव

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT