मुंबई

खोपोलीत दरड कोसळण्याची भीती

CD

खोपोलीत दरड कोसळण्याची भीती
तीन हजार रहिवासी वस्ती जीवन-मृत्यूच्या सीमारेषेत
खोपोली , ता. ९ (बातमीदार) ः खोपोलीत अनेक रहिवासी भागात दरड कोसळण्याची भीती कायम आहे, मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. विशेष म्‍हणजे तीन हजार नागरिक जीवन-मृत्यूच्या सीमारेषेत असल्याचे बोलले जात आहे. खोपोलीतील दरडग्रस्त रहिवासी भागाचे संरक्षण होण्यासाठी व योग्य कार्यवाही होण्यासाठी स्थानिक नागरिक, माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. स्थानिक आमदारांनी विधानसभा अधिवेशनात चर्चा घडवून आणली आहे, मात्र अद्यापही कायमस्वरूपी ठोस उपाययोजना मात्र झालेल्या नाहीत.
नगरपालिका क्षेत्रातील काजूवाडी, सुभाषनगर व यशवंतनगरचा काही भाग दरडप्रवण, राहण्यास धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही वस्तीत जवळपास ६५० ते ७०० रहिवासी घरे असून, साधारण ३००० च्या आसपास लोकवस्ती आहे. मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पहिल्या पावसात येथील वर्धमान नगर परिसरातील कमला या रहिवासी संकुलात मोठी दरड तसेच मोठ मोठे दगड कोसळले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्‍हती. याचदरम्यान मोगलवाडी भागात डोंगरावरील माती व दगड येथील घरांवर कोसळण्याची घटना घडली होती. यात आर्थिक नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी मात्र टळली होती. मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात माती व दगड रहिवासी भागात कोसळण्याच्या घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत. याही वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजूवाडी डोंगराचा मोठा भाग खचला होता, शिवाय माती आणि दगड रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तहसीलदार अभय चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी या रहिवासी भागाची पाहणी करून काही उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे सांगितले आहे.
खोपोलीतील दरड प्रवण क्षेत्राचे सहा वर्षांपूर्वी भूगर्भ सर्वेक्षण व तांत्रिक विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानुसार काजूवाडी, सुभाषनगर, यशवंतनगर, वर्धमाननगर, सहकारनगर आदी रहिवासी भागाला दरडीचा धोका वर्तवण्यात आला आहे. तसेच काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. यात अतिधोकादायक घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन, वस्ती व डोंगरामध्ये मजबूत संरक्षण भिंत उभारणे, जाळी बसविणे, परिसरात माती उत्खनन बंद करणे, नवीन बांधकामास परवानगी देताना पूर्ण सर्वेक्षण करून व उपयुक्त अटी व शर्तीनुसारच परवाना देणे आदींचा समावेश आहे. सहा वर्षांत अहवालातील कोणत्याही उपाययोजना खोपोली नगरपालिका व महसूल विभागाने पूर्ण केलेल्या नाहीत. आजही धोकादायक ठिकाणी माती उत्खनन, नवीन बांधकामे सुरू आहेत. संरक्षण भिंत बांधण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला असला तरी काही कामे अपूर्ण आहेत.
...............
मे महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काजूवाडी येथील मोठा भाग खचून माती व दगड खाली रस्त्यावर आल्यावर प्रशासन जागे झाले होते. या पार्श्वभूमीवर सुभाषनगर या दरडग्रस्त भागातील रहिवाशांना आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रिलमध्ये तालुक्यातील सर्वच विभागांनी सहभागी होऊन आपत्कालीन स्थितीबाबत सराव व प्रशिक्षण घेतले.
.....................

...............
खोपोली, ता. २५ (बातमीदार) इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर दरडग्रस्त रहिवासी भागांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रात तीन रहिवासी भाग दरड प्रवण म्हणून घोषित करण्यात आले आहेत. येथे जवळपास ३००० लोकवस्ती असून, रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन नगरपालिका व तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गतवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापननगर परिसरातील कमला रेसिडन्शी या रहिवासी संकुलात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचदरम्यान, मोगलवाडी भागात डोंगरावरील माती व दगड घरावर आल्याने नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT