मुंबई

महाडमध्ये महसूलची कोटींची उड्डाणे

CD

महाड, ता. १८ (बातमीदार) : महसूल विभागाकडून महाड तालुक्यामध्ये विविध प्रकारची शासकीय वसुली केली जाते. यात गौण खनिज वसुलीचा मोठा वाटा असतो. महाड महसूल कार्यालयाने २०२२ - २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये ३ कोटी १३ लाख ९० हजार रुपयांची गौण खनिज वसुली केली असून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक वसुली करत ११६ टक्के काम पूर्ण केले आहे. तर एकूण वसुली चार कोटी ९१ लाख ९२ हजार रुपयांची झाली आहे.
सरकारी वसुलीमध्ये महसूल विभागाचा मोठा वाटा असतो. प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये महसूल विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्टानुसार काम करावे लागते. महसूल विभागाकडून जमीन तसेच गौण खनिज वसुली मोठ्या प्रमाणात होते. जमीन महसूलमध्ये २ कोटी ३३ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात १ कोटी २८ लाख २ हजार रुपयांची जमीन वसुली महाड तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रस्ते बांधणी, दगड खाणी तसेच माती उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध प्रकल्पासाठी याची गरज असल्‍याने यातून महसूल विभागाला रॉयल्टीही मिळते. मुंबई-गोवा महामार्ग, रायगड रस्ता, खाडीपट्टा रस्ता तसेच औद्योगिक क्षेत्रातील कारखाने या ठिकाणी गौण खनिज मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.
महाड महसूल विभागाला दोन कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, परंतु या उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत तीन कोटी १३ लाख ९० हजारांची वसुली सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली. यामध्ये रेती उत्खनन वसुली, माती उत्खनन तसेच विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. गौणखनिज वसुली व जमीन महसुली यांच्यामार्फत महाड तहसील कार्यालयाने चार कोटी ९१ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा केला आहे.

मार्चअखेर सरकारी वसुली चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. गौण खनिजामध्ये दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक काम करत ११६ टक्के वसुली तब्‍बल ३ कोटी १३ लाख ९० हजार रुपयांची महसूल करण्यात आली आहे.
- सुरेश काशीद, तहसीलदार, महाड

महाड ः गौण खनिजातून सरकारी तिजोरीत मोठी भर पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT