सुनील पाटकर, महाड
रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्यकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर. किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय. रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत.
जगदीश्वराचे मंदिर आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन दरवाजे आहेत. तर जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत. यापैकी रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला नंदी आहे.
मंदिराचा परिसर १४ हजार चौरस फूट इतका आहे. छत्रपती शिवरायांची निस्सीम भक्ती असल्याने मंदिराची स्थापत्य कला लक्षवेधी आहे. शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते. अशी दोन यक्षमुखे दरवाज्याच्या वरील बाजूस कोरली आहेत. दारातून आत प्रवेश केला की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओव्या नजरेस पडतात. मंदिराचा गाभारा प्रशस्त आणि भव्य असा आहे.
किल्ल्यावरील वैभव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती देखील दस्तऐवजांमध्ये मिळते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजा पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. ‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर’ असा या शिलालेखाचा अर्थ आहे. तर दुसरा शिलालेख पूर्वेला दरवाजा बाहेर दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे. आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत आहे, तोपर्यंत जगदीश्वराचा प्रासाद असाच वैभवाने तळपत राहो, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. आजही या आशयाप्रमाणेच जगदीश्वराचे मंदिर मोठ्या दिमाखांमध्ये रायगड किल्ल्यावर आजही उभे आहे.
महाड ः जगदीश्वर मंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.