मुंबई

शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन देण्यासाठी पीक स्‍पर्धा

CD

महाड, ता. १० (बातमीदार) : पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, या दृष्टीने राज्य सरकारने ११ पिकांकरिता स्पर्धा आयोजित केली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हजारो रुपयांची बक्षीस जिंकण्याची संधी यातून मिळणार आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केल्‍यास इतर शेतकरी प्रोत्साहन घेतील, असा हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे आहे. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० गुंठे व इतर पिकांच्या बाबतीत किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा. या बाबत www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

आवश्‍यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८- अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

.........

पारितोषिके

तालुकापातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट- प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार,
जिल्हापातळी प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार,
राज्यपातळी प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार, तृतीय ३० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT