मुंबई

निवडणुकीसाठी १५हजार १६९ कर्मचारी तैनात

CD

महाड, ता. १७ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला निवडणुका होत असून यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ प्रशासनाकडून तैनात करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी तब्बल १५ हजार १६९ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रिया सहज व सुलभ होण्यास मदत होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता विविध स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सात मतदान केंद्रांमधील ८५ वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार यांचे गृहमतदानाचा कार्यक्रमदेखील पार पडला आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीकरिता कर्मचारी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २,७९० मतदान केंद्र असून ३० सहाय्यक मतदान केंद्र अशी एकूण २,८२० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर काम करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. जिल्ह्यामध्ये सात मतदान केंद्रांवर ३,४१९ मतदान केंद्राध्यक्ष आवश्यक असून ३,४७५ कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. तर, प्रथम मतदान अधिकारी म्हणून ३,४२६ कर्मचारी आवश्यक असून ३,५३४ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतर मतदान अधिकाऱ्यांमध्ये ७,३७१ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ८,१६० कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी १४,२१६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून १५,१६९ कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कोणतीही कमतरता मतदानाच्या दिवशी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये एक जिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांच्यासोबत विधानसभा मतदारसंघनिहाय नोडल अधिकारी अशी नियुक्त करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय कर्मचारी
पनवेल - ३,४८७
कर्जत - १,९६१
उरण - १,८९३
पेण - २,३६०
अलिबाग - १,९९२
श्रीवर्धन - १,७३४
महाड - १,७४२
........
एकूण - १५,१६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT