मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील 37 रुग्णालयांचा समावेश, गरीब गरजू रुग्णांना दिलासा

CD

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीत जिल्ह्यातील ३७ रुग्णालयांचा समावेश
गरीब गरजू रुग्णांना दिलासा
महाड, ता. २३ (बातमीदार) : राज्यात गोरगरीब रुग्णांना आणि तळागळातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक साह्य व्हावे आणि त्यांना उपचार वेळेवर मिळावेत, या हेतूने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेसाठी अनेकांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागतात. याचा विचार करून सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ३७ रुग्णालयांमध्ये या योजनेंतर्गत उपचार मिळणेही शक्य होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांना आता आर्थिक मदतीसाठी मंत्रालयात येण्याची गरज लागणार नाही, तर राज्यातील जिल्हा पातळीवर याचा अर्ज करून तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामध्ये जर एखाद्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना अर्ज दाखल करायचा असेल, तर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करता येऊ शकतो. रुग्ण व्यक्तीची सर्व आवश्यक कागदपत्रे, रुग्णालयाची कागदपत्रे आणि बँकेचा तपशील आदी अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयांचा समावेश
जिल्ह्यातील ३७ रुग्णालयांमध्ये दक्षिण रायगडमधील मेहर प्रसूती रुग्णालय माणगाव, आदित्य नर्सिंग होम, महाड, डॉ. ए. ए. देशमुख हेल्थ फाउंडेशन महाड या रुग्णालयांचा समावेश आहे. माधवबाबा आयुर्वेद कार्डिअक रिहॅब सेंटर, खोपोली, मंगला नर्सिंग होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उंबके फाटा, पेण, सुमितराज हॉस्पिटल खोपोली, निरामय हॉस्पिटल पेण यांसह बहुसंख्य रुग्णालये पनवेल व नवीन पनवेलमधील आहेत.

कोणाला मिळतो लाभ?
रुग्णालय राज्यामधील असणे आवश्यक असून याची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक असते. रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. रुग्णाकडे रेशन कार्ड व आधार कार्ड असणेही गरजेचे आहे.

या आजारांसाठी अर्थसहाय्य
या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत काही ठरावीक आजार चिन्हीत करण्यात आले आहे. यामध्ये कॉकलियर इम्प्लांट/ अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया (वय दोन ते सहा वर्षांपर्यंत), हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस, बोन मॅरो आणि हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूरोग, हदयरोग आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी यासह डायलिसिस, केमोथेरेपी, रेडिएशन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, भाजलेले रुग्ण, अस्थीबंधन आणि विद्युत अपघात आदी आजारांचा समावेश होतो. यामध्ये एक लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: शेतकऱ्याच्या पोराने कृषीमंत्र्यांना पाठवली ५,५५० रुपयांची मनी ऑडर, म्हणाला, "रमी खेळा, जिंका आणि मला पाठवा!"

Harshal Patil Sangli : हर्षल, तुझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही..., कोल्हापुरातले कॉन्ट्रॅक्टर आक्रमक; सरकारच्या विरोधात घेतली भूमिका

Gold Silver Price: सोन्याचे भाव 1 लाख रुपयांच्या खाली; चांदीमध्येही झाली घसरण, पुढे काय होणार?

Central Govt Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी मिळणार ३० दिवसांची सुट्टी, पगारही कापला जाणार नाही

Harshal Patil Case : हर्षल पाटील यांनी जीवन संपवले नसून तो खून; मृत्यूसाठी सरकारच जबाबदार असल्याचा रोहित पवार यांचा आरोप

SCROLL FOR NEXT