महाडमधील तळोशी गावच्या विकासाला चालना
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आढावा
महाड, ता. १६ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी महाड तालुक्यातील तळोशी गावाला नुकतीच भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. त्यामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले. यामुळे तळोशी गावच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या वेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तानपुरे, महाड पंचायत समिती गटविकास अधिकारी उदयसन साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र जाधव, विस्तार अधिकारी नंदकुमार भगत, अधिकारी दशरथ वाघमोडे आणि सरपंच साक्षी पार्टे, ग्रामविकास अधिकारी संदीप बागडे व सचिन पार्टे, दिलीप पार्टे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, अंगणवाडी सुविधा आणि शाळांच्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींना सक्षम व स्वयंपूर्ण बनवणे हा असून, गाव पातळीवर प्रशासन अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश दिले.
स्वच्छता उपक्रमांचे कौतुक
तळोशी ग्रामपंचायतीने केलेल्या स्वच्छता उपक्रमांचे कौतुक करताना पाणी व्यवस्थापन व हरित उपक्रम वाढवण्यावर भर देण्यात आला. गावातील रस्ते व गटारींची स्थिती सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली.
या भेटीमुळे तळोशी गावच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत प्रशासनानेही शासनाच्या सूचनांनुसार कामे प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
....
फोटो - गावातील शेती उपक्रमाची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व इतर अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.