मुंबई

अतिक्रमणे न हटवल्यास नगरसेवकांचे बेमुदत उपोषण

CD

अतिक्रमणे न हटवल्यास नगरसेवकांचे बेमुदत उपोषण
महाड शहरातील बेकायदा टपऱ्या, अतिक्रमणांवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाड, ता. १५ (बातमीदार) : महाड शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेली बेकायदा अतिक्रमणे, टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. १९ मार्चपर्यंत अतिक्रमणे हटवली नाहीत तर २० मार्चपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या १३ नगरसेवकांकडून नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाड हे ऐतिहासिक शहर असून येथे चवदार तळे आणि रायगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तसेच हे शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे कायम वाहतुकीची वर्दळ असते. मात्र शहरात अनेक ठिकाणी टपऱ्या व अतिक्रमणे वाढल्याने रस्ते अरुंद झाले असून, वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच दोन वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई झाली नसल्याने हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
चौकट
शहराच्या स्वच्छ प्रतिमेला धोका
महाड शहराला यापूर्वी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छतेबाबत पारितोषिक मिळाले आहे. मात्र शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे आणि अनधिकृत टपऱ्यांमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून, स्वच्छतेच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाजारपेठ परिसरात रस्त्यावरच विक्रेत्यांनी दुकान मांडल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी तातडीने अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT